पुणे : कसबा विधानसभा पोट निवडणुकेची मतदान प्रक्रिया रविवारी (ता२६) पार पडली. या निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजपचे हेमंत रासने, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यावर तर गोपनियतेचा भंग केल्याप्रकरणी राष्ट्रावादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रसाने यांनी गळ्यात भाजपाचे उपरणे घालून मतदान केंद्रात प्रवेश केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपा पैसे वाटत असल्याचा आरोप करून कसबा गणपती येथे पत्नीसह आंदोलन करणारे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर देखील आचारसंहिताचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी गोपनियतेचा भंग केल्याचा आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत ४६ उमेदवारांनी आजमावले नशीब…!
भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर लागलेल्या पोट निवडणूक भाजपचे उमेदवार हेमंत रासने, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर या दोन प्रमुख उमेदवारांसह इतर १६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत काल रविवारी (ता.२६) ५०.०६ टक्के मतदान झाले. चिंचवडमध्ये भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर या पोटनिवडणुकीत भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे नावा काटे या दोन प्रमुख उमेदवारांसह इतर २६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
यानिवडणुकीत काल रविवारी (ता.२६) ५०.४७ टक्के मतदान झाले आहे. तर या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी (ता. ०२ मार्च) लागणार आहे.