पुणे : ‘तुला आज संपवतोय, असे म्हणत, पत्नीच्या डोक्यावर कोयत्याने वार करुन तिला गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकणी आरोपी पतीवर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंद मसाजी वाघमारे ( वय. ३७, रा. साई अविष्कार सोसायटी, फलॅट नं. 303, ओ विंग, चव्हाणबाग, डीएसके रोड, धायरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. करुणा आनंद वाघमारे (वय ३१) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पत्नी करुणा यांनी नेकलेस दागिन्यासाठी ४ महिन्यापूर्वी २५ हजार रुपयांचे बुकींग केलेल्या पैशांबाबत विचारणा केली असता आनंद याने चिडून वाद घातला. वादानंतर करुणा त्यांच्या मुलासह त्यांच्या वडिलाकडे निघाल्या असताना आनंद याने चिडून शिवीगाळ केली.
त्यानंतर आरोपी आनंद याने बेडखालुन कोयता काढून ‘तुला आज संपवतोय’, असे म्हणत करुणा यांच्या डोक्यात, उजव्या भुवईच्या वर तसेच उजव्या कानाचे वर कोयत्याने सपासप वार केले.
याप्रकणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आरोपी आनंद वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.