पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. मशिदीमध्ये नमाज पठण करायला गेलेल्या ९ वर्षीय मुलावर मशिदीतील कर्मचाऱ्याकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. 10 नोव्हेंबर 2023 रोजी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित मुलाच्या मामाने याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात तकार दिली असून मोहम्मद युसुफ या कर्मचाऱ्यावर पोक्सो अंतर्गत (POCSO) कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर कोंढवा परिसरात संतापाची लाट उसळली आहे. (Pune Kondhwa News)
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, नऊ वर्षाचा मुलगा हा 10 नोव्हेंबर रोजी कोंढवा येथील उस्मानिया मशिदीत त्याच्या मित्रांसोबत नमाज पठण पाडण्यासाठी गेला होता. नमाज झाल्यानंतर मित्रासह मशिदीत तो थांबला होता. यावेळी आरोपी तेथे आला आणि त्याने पीडित अल्पवयीन तसेच त्याच्या मित्राला तो राहत असलेल्या मशिदतील त्याच्या खोलीत घेऊन गेला. तिथे त्याने नमाज पठणाविषयी थोडी माहिती दिली. नंतर त्याने पीडिताच्या मित्राला बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलावर आरोपीने लैंगिक अत्याचार केला.(POCSO)
या प्रकारानंतर मुलाने घरी येऊन घडलेला सर्व प्रकार त्याच्या घरच्यांना सांगितला. मात्र घरच्यांनी बदनामीच्या भीतीने कोणालाही याबाबत सांगितलं नाही. मात्र मुलाच्या मामानी त्यांचा भाचा नमाज पठणासाठी का जात नाही अशी विचारणा बहिणीला केली असता बहिणीने घडलेला धक्कादायक प्रकार मामाला सांगितला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सध्या कोंढवा पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.(Pune Rape Case)