अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरुर तालुक्यातील कोंढापुरी येथे एका व्यक्तीने दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मोहन धोंडू गायकवाड (वय-52, रा. कोंढापुरी, ता. शिरुर, जि. पुणे) असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत मिलिंद संभाजी गायकवाड (वय-55 वर्षे, रा. कोंढापुरी, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन गायकवाड हे सकाळच्या सुमारास नाष्टा करुन घरात बसलेले होते. मात्र, बराच वेळ बाहेर आले नसल्याने काही वेळाने कुटुंबातील व्यक्तीने त्यांना घरात पहिले असता त्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस हवालदार मंगेश लांडगे हे करत आहेत.