पुणे : पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आत्याच्या 15 वर्षीय अल्पवयीन नातवाने लपाछपी खेळण्याचे बहाण्याने 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ही मुलगी 5 महिन्यांची गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी मुलीच्या आईने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही अल्पवयीन आहेत. हा प्रकार मार्च 2024 च्या शेवटच्या आठवड्यापासून ते मे 2024 या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा व मुलगी हे दोघेजण नातेवाईक आहेत. मुलाने मुलीला लपाछुपी खेळु असे सांगून पहिल्या मजल्यावर घेऊन गेला. तिला म्हणाला कि, तेथे आपण सेक्स करुया, खूप मज्जा येते. पण याबाबत कोणाला काहीही सांगू नकोस असे सांगितले. अन तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले. असे 4 ते 5 वेळा त्याने कृत्य केले आहे. त्यातूनच ही मुलगी गर्भवती झाली आहे. पीडित मुलगी ही ५ महिन्याची गर्भवती झाल्यानंतर उघडकीस आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.