लोणी काळभोर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावीचा निकाल सोमवारी (ता.२७) दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील ग्रामीण सर्वांगीण विकास विद्यालयाचा निकाल ९८.९७ टक्के लागला आहे. अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना मुखवटे यांनी दिली आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी विद्यालयातील ९८ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. या परीक्षेत ९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर एक विद्यार्थी अनुर्तीर्ण झाला आहे. दहावीच्या परीक्षेत जयदीप हौशीराम जाधव याने ८८.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. शिवतेज संतोष कुंजीर याने ८८.२० टक्के गुण मिळवून द्वितीय तर संस्कृती बाबुराव कुंजीर हिने ८२.२० टक्के तृतीय क्रमांक पटकाविला आहे. विद्यार्थी आदित्य चंद्रकांत भोसले याने ८०.८० टक्के गुण मिळवून चतुर्थ क्रमाक पटकाविला आहे. यशस्वी विध्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना मुखवटे यांनी अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.