पुणे : गेल्या आठवडाभरात राज्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यानंतर पावसाने गेले काही दिवस विश्रांती घेतली होती. परंतु आता पुन्हा पाऊस सुरु झाला आहे. मावळ तालुक्याला व पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणा-या पवना धरणाचा पाणीसाठा 97.17 टक्के झाला आहे.
पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मागील 24 तासांत केवळ 32 मिलीमीटर पावसाची नोंद धरण क्षेत्रात झाली आहे. त्यामुळे पवना धरणातून विद्युत गृहाद्वारे 800 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
शहरासह मावळ तालुक्यातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्त्रोत पवना धरण आहे. गेल्या काही दिवसांपासून पवना धरण क्षेत्रात सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे पवना धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे.