पुणे : दरवेळी निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असते, तेव्हा लोकप्रतिनिधी असो अथवा प्रशासन यांच्याकडून महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत उद्यान, रस्ते, पाणी या विभागांसह समाविष्ट गावांमधील विविध विकासकामांना मंजुरी दिली जाते. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेऊन ९० कोटींच्या १६० प्रस्तांवाना मंजुरी देण्यात आली.
विकासकामे रखडू नये, म्हणून पालिका प्रशासनाची शुक्रवारी सकाळपासून लगबग सुरू होती. उद्यान, रस्ते, पाणी, समाविष्ट गावांमधील विविध विकासकामे यांचा समावेश होता. स्थायी समितीच्या कार्यपत्रिकेवर २१ प्रस्ताव मंजुरीसाठी दाखल केले होते. स्थायी समितीला ऐन वेळी समारे १३९ प्रस्ताव मंजरीसाठी दाखल करण्यात आले. स्थायी समितीच्या या बैठकीत सुमारे ९० कोटींच्या १६० प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
स्थायीची लागोपाठ दोन दिवस बैठक
स्थायी समितीची बैठक गुरुवारी होती. या बैठकीत सर्वसाधारण सभेला मंजुरीसाठी पाठविण्यात येणाऱ्या विषयांना मान्यता देण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. ही बैठक सुमारे दोन तास सुरू होती. स्थायी समितीची सलग दोन दिवस लागोपाठ बैठक होऊन विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.