अरुण भोई
दौंड : दौंड तालुक्यातील शेतकरी बांधवांना आपला शेतमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्यासाठी दर्जेदार रस्ते मिळावेत, नागरिकांचे दळणवळण सोयीस्कर व्हावे, या उद्देशाने दौंड तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्यांच्या कामासाठी निधी मिळावा, अशी मागणी आमदार ॲड. राहुल कुल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली होती. या मागणीनुसार दौंड तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्यांच्या कामासाठी डिसेंबरच्या पुरवणी अर्थसंकल्पात सुमारे ८० कोटी रुपयांचा भरघोस निधी मिळाल्याची माहिती आमदार ॲड. राहुल कुल यांनी दिली. दौंड तालुक्यातील प्रत्येक घटकांचा विकास करण्यासाठी यापुढील काळात देखील प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार ॲड. राहुल कुल यांनी या वेळी सांगितले.
दौंड तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्याच्या कामासाठी खडकी ते दौंड तालुका हद्द रस्ता, देऊळगावराजे ते पेडगाव रस्ता, मलठण हनुमानवाडी ते भिगवण, राशिन रस्ता व काळेवाडी (प्रजिमा ८१) ते प्रजिमा ८० ते भापकरवस्ती रस्ता सुधारणा करणे- २० कोटी, बोरीबेल ते देऊळगाव राजे व दौंड-लिंगाळी ते मळद रस्ता सुधारणा करणे- २० कोटी, राहू ते टेळेवाडी चौकापर्यंत रस्त्याची सुधारणा करणे- २ कोटी ५० लाख, स्वामी चिंचोली-राजेगाव ते नायगाव रस्त्याची सुधारणा करणे- २ कोटी, बोरीऐंदी-ताम्हणवाडी ते तालुका हद्द रस्त्याची सुधारणा करणे- २ कोटी ५० लाख, सोलापूर महामार्ग ते फरगडेवस्ती माळवाडी रस्त्याची सुधारणा करणे- ३ कोटी, पाटेठाण ते टेळेवाडी चौक रस्त्याची सुधारणा करणे- ३ कोटी, रेल्वे गेट ते हातवळण रस्त्याची सुधारणा करणे- ४ कोटी, पुणे-सोलापूर महामार्ग ते स्वामी चिंचोली ते राजेगाव नायगाव रस्ता सुधारणा करणे- २० कोटी, खुटबाव-ऐकेरीवडी-देलवडी रस्त्याची सुधारणा करणे- ३ कोटी, असा निधी डिसेंबरच्या पुरवणी अर्थसंकल्पात मिळालेला आहे.
या भरघोस निधीमुळे दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात मजबूत रस्त्यांचे जाळे निर्माण होणार असल्याने शेतकरी व नागरिकांनी आमदार ॲड. राहुल कुल यांचे आभार मानले.