पुणे : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी १८ जागांसाठी सुमारे ७२.२८ टक्क्यांइतके चुरशीने मतदान झाले. एकूण १७ हजार ८१२ मतदारांपैकी १२ हजार ८७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ८ वाजल्यापासून तीनही मतदान केंद्रावर मोठ्या उत्साहाने मतदानास सुरुवात झाली.
बाजार समितीच्या १८ जागांसाठी ५७ उमेदवार रिंगणात
बाजार समितीच्या १८ जागांसाठी ५७ उमेदवार रिंगणात आहेत. तर एकूण तीन ठिकाणच्या ३१ मतदान केंद्रावर सकाळच्या पहिल्या टप्प्यापासूनच मतदानासाठी सर्वच गटातील मतदारांनी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.
विकास सोसायटी मतदार संघात ११ जागांसाठी २९ उमेदवार रिंगणात असून मतदारांची संख्या १ हजार ९१८ आहे. त्यापैकी १ हजार ७०० मतदान (८८.६३ टक्के) झाले. ग्रामपंचायत मतदार संघाच्या ४ जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असून मतदारांची संख्या ७१३ आहे. त्यापैकी ६६८ मतदान (९३.६८ टक्के) मतदान झाले. मतदानाचा सर्वाधिक टक्का ग्रामपंचायत मतदार संघात दिसून आला आहे.
आडते-व्यापारी मतदार संघातील २ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असून मतदारांची सर्वाधिक म्हणजे १३ हजार १७४ इतकी संख्या आहे. यापैकी ८ हजार ७०५ (६६ टक्के) इतके मतदान झाले.
दरम्यान, हमाल-मापाडी मतदार संघाच्या १ जागेसाठी ५ उमेदवार रिंगणात असून मतदारांची संख्या २००७ इतकी आहे. त्यापैकी १ हजार ८०३ ( ८९.८३ टक्के) मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांकडून मिळाली. शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून मुकुंदनगर येथील शिवशंकर सभागृहात मतमोजणी होणार आहे.
Election : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी 96.23 टक्के मतदान
Election : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दुपारपर्यंत पर्यंत ३३.०९ टक्के मतदान..!