पुणे : पुणे शहर आयुक्तालयातून फुरसुंगी, काळेपडळ, खराडी, वाघोली,आंबेगाव, नांदेडसिटी व बाणेर ही ७ पोलीस ठाणे उद्या शुक्रवार पासून (ता.११) कार्यान्वित होणार होणार आहे. शिवाजीनगर येथील पोलीस आयुक्तालयातून या ७ पोलीस ठाण्याच्या उद्घाटनाची जोरदार तयारी सुरु आहे.
या पोलीस ठाण्यांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या शुक्रवारी (ता.११) होणार आहे. उद्घाटन झाल्यानंतर लगेचच या नवीन ७ पोलीस ठाण्याचे शासकीय कामकाज सुरु होऊन कार्यान्वित होणार आहेत.
पुणे शहर पोलीस आयुक्तयातील हडपसर, वानवडी, कोंढवा या पोलीस ठाण्यांचे विभाजन करुन काळेपडळ पोलीस ठाणे, लोणी काळभोर हडपसर पोलीस ठाण्यांचे विभाजन करुन फुरसुंगी पोलीस ठाणे आणि चंदननगर लोणीकंद पोलीस ठाण्याचे विभाजन करन खराडी पोलीस ठाणे, लोणीकंद पोलीस ठाण्याचे विभाजन करुन वाघोली पोलीस ठाणे, भारती विद्यापीठ पोलीस वाण्याचे विभाजन करुन आंबेगाव पोलीस ठाणे, चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्याचे विभाजन करुन बाणेर पोलीस ठाणे, सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे विभाजन करुन नांदेडसिटी पोलीस ठाणे, अशी ७ नवीन पोलीस ठाणे उद्या शुक्रवारपासून (ता.११) नव्याने सुरु होतील.