पुणे : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकेचे वारे वाहू लागले आहे. सर्व राजकीय नेत्यांनी गाव दौरे सुरु केले आहेत. तसेच जाहीर सभा घेऊन विरोधकांवर टीका देखील केल्या जात आहेत. अशातच आता कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणाचा खुलासा केला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने परवाच भाजपाचा अंतर्गत सर्व्हे आला असून त्यात अजित पवारांच्या गटाला ७-११ जागा, शिंदे गटाला १७-२२ जागा आणि भाजपाला ६२-६७ जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्यानं भाजपामध्ये भीती पसरली आहे. असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे. या सर्वेमुळे भाजपचे टेन्शन वाढणार आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
एका internal source च्या माहितीनुसार परवाच भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला असून त्यामध्ये अजितदादांच्या गटाला ७-११ जागा, शिंदे साहेबांच्या गटाला १७-२२ जागा आणि भाजपला ६२-६७ जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्याने भाजपमध्ये अंतर्गत गोटात भीती पसरली आहे. यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत.
एका internal source च्या माहितीनुसार परवाच भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला असून त्यामध्ये अजितदादांच्या गटाला ७-११ जागा, शिंदे साहेबांच्या गटाला १७-२२ जागा आणि भाजपला ६२-६७ जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्याने भाजपमध्ये अंतर्गत गोटात भीती पसरलीय. यातूनच केंद्रीय…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 10, 2024
भाजपच्या एका मोठ्या केंद्रीय नेत्याने परवा अजितदादांना काही ठराविक जागा ऑफर केल्या असून अजितदादांनी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदारसंघातच रोखण्यासाठी त्यांच्या विरोधात मोठे नेते उभे केले किंवा अपक्ष उभे करण्याची तयारी दाखवली तर ६ ते ७ जागा अतिरिक्त देण्याचीही ऑफर दिलीय.
कर्जत_जामखेड संदर्भात तर “कुछ भी कर के, अभी उसे वही पे रोको”, असं सांगितल्याने कर्जत_जामखेडची लढत राज्यात सर्वाधिक लक्षवेधी आणि तेवढीच इंटेरेस्टिंग होणार हे नक्की आहे. पण मीही या महाकाय शक्तीसोबत दोन हात करायला सज्ज असून या महायुद्धात कर्जत-जामखेडकर स्वाभिमान आणि निष्ठा काय असते, ते या महाशक्तीला दाखवून देतील, असा विश्वास आहे
रोहित पवार यांची सोशल पोस्ट