पुणे: मंगळवार सात मे रोजी देशात आणि महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. राज्यात 11 लोकसभेच्या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 61.40 टक्के मतदान झाले. यामध्ये कोल्हापुर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 70.35 टक्के मतदान झाले, तर बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी 56.7 टक्के मतदान झाले आहे.
लोकसभा मतदारसंघानुसार मतदानाची टक्केवारी
लातूर – 60.18 टक्के
सांगली – 60.95 टक्के
बारामती – 56.7 टक्के
हातकणंगले – 67.61टक्के
कोल्हापूर – 70.35 टक्के
माढा – 62.17 टक्के
उस्मानाबाद – 60.91 टक्के
रायगड – 58.10 टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग- 59.23 टक्के
सातारा – 63.5 टक्के
सोलापूर – 57.61 टक्के