यवत : नागनाथ ज्येष्ठ नागरिक संघ, पाटस व हेल्पेज इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने गरजुवंत ज्येष्ठ नागरिकांना 60 काठ्या वाटप करण्यात आल्या. या योजनेंतर्गत पाटस, कुसेगांव, रोटी, हिंगणीगाडा, मांडवगण फराटा येथील ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेतला. संस्थेच्या मार्फत संपुर्ण भारतात 170 फिरते दवाखाने असून त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा पुरविली जाते.
प्रति वर्षी 40 हजार मोतीबिंदु शस्त्रक्रिया मोफत केल्या जात असल्याचे नागनाथ ज्येष्ठ नागरिक संघ पाटस, संस्थापक अध्यक्ष डॉ.पांडुरंग श्रीपतराव लाड यांनी सांगितले. यावेळी हेल्पेज इंडिया कंपनी पुण्याचे प्रमुख राजीव कुलकर्णी, सतीश काटु, मोहन देशमाने, नागनाथ ज्येष्ठ नागरिक संघ पाटसचे सचिव रामचंद्र कुंभार, सदस्य गोविंद माने यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमास दौंड-शिरुर तालुका ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीचे सचिव रंगनाथ शितोळे, सदस्य दादासाहेब फराटे, श्री भानोबा ज्येष्ठ नागरिक संघ कुसेगावचे अध्यक्ष विठ्ठलराव शितोळे, उपाध्यक्ष सदाशिव सोनवणे, भाऊसाहेब शितोळे यांसह ज्येष्ठ नागरिक संघ व हेल्पेज इंडियाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.