-बापू मुळीक
सासवड : दुस-या व्यक्तीचा फ्लॅट दाखवून सहा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार सासवड येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी महिलेने पोलीसात तक्रार करुनही याची दखल घेतली नसल्याचे महिलेने तक्रारीत सांगितले आहे.
येथील सुषमा राजेश गुंड ही महिला सासवड एसटी महामंडळ मध्ये वाहक म्हणून 15 वर्षापासून कार्यरत आहेत. गुंड यांनी सासवड मध्ये फ्लॅट घेण्याचे ठरवले. पण त्यांची तब्बल सहा लाखांची फसवणूक करण्यात आली. सासवड पोलीस स्टेशन समोर कृषी समितीच्या मागे त्यांचे राधिका रियल इस्टेट हे ऑफिस आहे. तानाजी मराठे या व्यक्तीने सासवड या ठिकाणी संत सोपान काका मंदिराच्या मागे, जुना कोडीत रोड प्लॉट नंबर 42, सर्वे नंबर 489/6 हा प्लॉट दाखवला होता. तो प्लॉट आम्हाला खरेदी करायचा होता. त्यासाठी सुषमा गुंड यांनी गावातील एका व्यक्तीस टप्प्याटप्प्याने सहा लाख रुपये दिले पण त्यांना प्लॉट मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी त्या व्यक्तीकडे पैसे परत मागितले तरी त्यांना अद्यापही पैसे परत मिळाले नाही. तसेच एक वर्षापासून जागाही मिळाली नाही. त्या व्यक्तीने पैसे परत करण्यासाठी दोन चेक दिले. परंतु ते चेकही बाऊन्स झाले.
यासंदर्भात सासवड पोलीस स्टेशन मध्ये, तानाजी मराठे या व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्या व्यक्तीविरुद्ध योग्य ती कारवाई करून पैसे परत मिळावे, अशी मागणी सुषमा गुंड यांनी केली आहे.