बापू मुळीक / सासवड : पुरंदर तालुका भारतीय जनता पार्टीची मासिक बैठक निलेश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने भाजपा सदस्या अभियान, तसेच आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक तसेच संघटनात्मक कामकाजाबद्दल चर्चा झाली. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व देवेंद्रजी फडणवीस व पदाधिकाऱ्यांचा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.
भारतीय जनता पार्टीचा पालकमंत्री व्हावा या संदर्भातील ठराव पास करण्यात आला. विजय शिवतारे यांचे आमदार पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले व पुरंदर तालुक्याला विजय शिवतारे यांच्या रूपाने मंत्री पद मिळावे असा ठराव करण्यात आला. माजी आमदार अशोक टेकवडे, पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष गंगाराम जगदाळे, प्रदेश युवा मोर्चाचे सचिव श्रीकांत ताम्हाणे, सरचिटणीस मयूर जगताप, संदीप कटके, बाळासाहेब भोसले, साकेत जगताप, मा. सभापती रमेश मोकाशी, प्रकाशजी खेडेकर, युवा मोर्चा अध्यक्ष दिलीप कटके, महिला मोर्चा अध्यक्ष मंगल ताई पवार इतर पदाधिकारी उपस्थित होते.