पुणे : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची घटना घडली. उभ्या असलेल्या टँकरला दुचाकी धडकल्याने एका लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. गार्गी रवींद्र पाटील(वय 5 वर्ष ) असे मृत मुलीचे नाव आहे. या प्रकरणी टँकर चालकाविरुध्द इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल जिप्सीसमोर टँकर पार्क केला होत. मात्र तो वाहतुकीस अडथळा ठरेल, या पध्दतीने लावण्यात आला होता. या टँकरला कराडकडे जाणाऱ्या दुचाकीने ठोकले. यात गार्गी रवींद्र पाटील या 5 वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुचाकी चालक रोहन राजेंद्र पाटील (वय 24 वर्ष) हा गंभीर जखमी झाला आहे.
याप्रकरणी टँकरचालक सचिन पाटील याच्याविरुध्द इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.