लोणी काळभोर: राष्ट्रीय अर्थ – कम – गुणवत्ता शिष्यवृत्ती अर्थात ‘एनएमएमएस’ परीक्षेत लोणी काळभोर (ता. हवेली) येथील कन्या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. या परीक्षेत विद्यालयातील ४७ विद्यार्थिनींनी उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला आहे. कन्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या या यशामुळे त्यांचा जिल्ह्यात दबदबा निर्माण केला आहे. तर यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
राष्ट्रीय अर्थ – कम – गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षा डिसेंबर २०२३ रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेत जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये कन्या प्रशालेच्या ५२ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत प्रशालेच्या ४७ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. यशस्वी विद्यार्थिनींना शिक्षक अरविंद राठोड, सतीश कदम, पांडूरंग पाटील, सुनील जेधे यांचे बहुमुल्य मार्गदर्शन मिळाले. तर विद्यार्थ्यांना शिक्षिका रुमा तिडके यांचे सहकार्य लाभले.
राष्ट्रीय अर्थ – कम – गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षा ही १८० गुणांची असते. यामध्ये बुद्धिमत्ता, गणित, विज्ञान व समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास असतो. या परीक्षेच्या गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी केंद्राकडून १५ हजार रुपये मिळतात. तसेच केंद्राच्या गुणवत्ता यादीनंतर सारथीची गुणवत्ता यादी जाहीर केली जाते. या यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी ९६०० रुपये शिष्यवृत्ती मिळते.
दरम्यान, यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थ सहसचिव प्राचार्य सीताराम गवळी व कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका निशा झिंजुरके यांच्या हस्ते भव्य सत्कार करून पेढे वाटण्यात आले. तसेच मान्यवरांनी विद्यार्थिनींना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी दिलीकुमार सूर्यवंशी, बी.व्ही.भोसले, ए. डी राठोड, पी. व्ही पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यशस्वी विद्यार्थिनींचे व शिक्षकांचे सर्वत्र कौतुक
राष्ट्रीय अर्थ – कम – गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षेत कन्या प्रशालेच्या तब्बल ४७ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. हे यश मिळवून विद्यार्थिनींनी लोणी काळभोर गावाच्या शिरपेचात तुरा रोवला आहे. त्यामुळे यशस्वी विद्यार्थिनी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षकांचे लोणी काळभोरसह जिल्ह्यातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
उत्तीर्ण विद्यार्थिनी पुढीलप्रमाणे :
संस्कृती जितेंद्र तांदळे, तनिष्का मारुती काळभोर, प्राची सचिन राऊत, समृद्धी कैलास करंडे, सानिका दादा काळभोर, गायत्री संतोष दीक्षित, अक्षदा संतोष वाघ, आदिती तुकाराम जंजिरे, प्रांजल दादासाहेब सोनवणे, अक्षदा अमोल कांबळे, अनुष्का प्रकाश कराड, आरती किशोर चौरे, गायत्री सतीश काळभोर, सायुजा गणेश सोनवणे, आदिती महादेव विरकर, मानसी नारायण आटोळे, श्रावणी शरद वारे, वैष्णवी आनंद काळे, कस्तुरी अमर जगदाळे, अनुष्का विकास खराटे, श्रेया दीपक गजेंद्र, दिव्या संतोष राईकवाडे, सिद्धी विजय यादव, राणी विजय महाडिक, श्रद्धा किरण गपाटे, अक्षरा हरिभाऊ जोगदंड, निकिता उद्धव गुरधाळकर, श्रुती श्रीकांत जगताप, रसिका सुदर्शन परखंदे, प्रतीक्षा प्रकाश राठोड, सलोनी योगेश नडगम, दिशा संजय भुसारी, अमृता हरीश वाळुंजकर, प्रज्ञा प्रल्हाद मुढ़े, नेहा व्यंकटेश राठोड, ऋतुजा विजय सोनकांबळे, दिव्या शामराव जाधव, स्मिता वामन सगट, श्रावणी शरद सावंत, हर्षदा रमेश थोरात, रक्षिता पिराप्पा मैसून, समीक्षा विकास कोंडे, श्वेता सतीश पाटोळे, सारा अदरिया दनाने, सोनल सुदाम खेडेकर, प्राची अजित ताकतोडे, गौरी विकास सदाफुले.