पुणे : पुण्यात म्हाडाच्या ६०५८ घरांच्या सोडतीसाठीची अर्जविक्री-स्वीकृतीची मुदत अखेर संपुष्टात आली असून अर्ज मोठ्या प्रमाणात दाखल करण्यात आले आहेत.
यामध्ये ४६ हजारांहून अधिक अर्ज सादर झाले आहेत. पुणे मंडळाला चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी औरंगाबाद मंडळाच्या ९३६ घरांच्या सोडतीला कमी प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. दोन आठवड्यांत या घरांसाठी अनामत रक्कमेसह केवळ २१८ अर्ज जमा झाले आहेत. आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरून अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. यात तीनशे-चारशे अर्जांची भर पडण्याची शक्यता आहे.
पुणे आणि औरंगाबाद मंडळातील घरांची सोडत नव्या सोडत प्रकियेनुसार आणि नवीन संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून काढली जात आहे. त्यानुसार कायमस्वरुपी एक नोंदणी प्रक्रियेस ५ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. एक नोंदणी प्रक्रियेस ५ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. ५ जानेवारी ते २६ फेब्रुवारीदरम्यान एक लाख १६ हजार ५४७ जणांनी नोंदणी केली आहे. लवकरच याची पुढील प्रक्रिया पार पडणार आहे.