रांजणगाव गणपती: हॅलोजन लावत असताना पिंपरखेड, ता. शिरुर येथे इलेक्ट्रिक करंट लागल्याने गणेश लक्ष्मण गुंड वय ४२ वर्ष रा. पिंपरखेड ता. शिरुर जि. पुणे यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत आर. एस मांडवी सहाय्यक फौजदार मंचर पोलीस स्टेशन यांनी खबर दिली आहे. पिंपरखेड येथे गणेश लक्ष्मण गुंड वय ४२ वर्ष रा. पिंपरखेड ता. शिरुर जि. पुणे हे हॅलोजन लावत असताना त्यांना इलेक्ट्रिक करंट लागल्याने ते बेशुद्ध पडले होते.
त्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. यासंदर्भात आधिक तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उबाळे करीत आहे