-सागर जगदाळे
भिगवण : पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत भिगवण या गावास रस्त्यांच्या कामांसाठी 40 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती सरपंच दिपिका क्षीरसागर यांनी दिली.
अनु.जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या अंतर्गत सदरची कामे मंजूर झाली आहे. यामध्ये साईनगर परिसर (वार्ड क्र. 2) 10 लाख रु, शिवाजीनगर परिसर (10 लाख रु.) रो हाऊस परिसर (वार्ड क्र.4) 10 लाख रु, आणि स्वामी विवेकानंद नगर (वार्ड क्र. 4) 10 लक्ष रु. याप्रमाणे सुमारे 40 लाख रु.याप्रमाणे सिमेंट रस्त्यांची कामे मंजूर झाली आहेत. सदरचा निधी ज्या कामासाठी मंजूर झालेला आहे. त्याच कामासाठी खर्च करता येणार आहे.
इतर कामासाठी तो खर्च करता येणार नसल्याचे मान्यता पत्रामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. दोन वर्षाच्या कालावधीत सर्वाधिक रस्ते झाले असून भिगवणमध्ये दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे भिगवन गावच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
गावच्या विकासासाठी सातत्यपूर्ण विकास कामे करणे गरजेचे आहे. या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये सातत्यपूर्ण विकासकामे झाल्याने ग्रामस्थ समाधानी आहेत.
-मुमताज जावेद शेख, उपसरपंच-भिगवण