पुणे : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड विभागांतर्गत २ ऑक्टोबरपासून दौंड आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघांत विशेष मोहीम राबवून ३३ लाख ८९ हजार ८९१ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक विजय रोकडे यांनी दिली आहे. या कारवाईत एकूण ६१ गुन्हे नोंदविण्यात आले असून, एकूण ५८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अवैध मद्य वाहतूक करणारी एकूण २ चारचाकी व ७ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. गावठी हातभट्टी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत निरीक्षक विजय रोकडे, दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरुक, मयूर गाडे, दिनेश ठाकूर, सहायक दुय्यम निरीक्षक सुवास पोळ, अशोक पाटील, संकेत वाजे, प्रवीण सूर्यवंशी, सौरभ देवकर, जवान आणि वाहनचालक केशव वामने सहभागी होते.