पुणे : फरासखाना पोलीस स्टेशन अंतर्गत (Faraskhana Police Station) असलेल्या शनिवार वाडा गेटसमोर (Shaniwar Wada gate) एका इसमाकडून 3 लाख 80 हजार 500 रुपये इतकी रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा देवकाते यांनी दिली. मंगळवारी (ता. २३) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हि रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
पुणे लोकसभा मतदार संघाअंतर्गत कसबा पेठ विधानसभा मतदार संघात निवडणूक कामासाठी नियुक्त स्थिर सर्वेक्षण पथकामार्फत दुपारच्या सुमारास फरासखाना पोलीस स्टेशन अंतर्गत शनिवार वाडा गेटसमोर एका इसमाकडून ही रक्कम जप्त करण्यात आली. रकमेबाबत सदर व्यक्तीने योग्य स्पष्टीकरण न दिल्याने ही रक्कम जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात आचार संहिता लागू झाली आहे. त्यामुळे निवडणूक विभागाकडून (Election Department )अशा प्रकारची कारवाई केली जात आहे. आपल्याजवळ असलेल्या रोख रकमेबाबत नागरिकांना तपशील सादर करणे आवश्यक असते. मोठ्या प्रमाणात रोकड नेत असताना आढळल्यास निवडणूक विभागाकडून कारवाई केली जात आहे.