पोपट पाचंगे
रांजणगाव गणपती: सरदवाडी, ता.शिरुर येथील श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अभिनव विद्यालयाचे 11 विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (एनएमएमएस) शिष्यवृत्ती धारक तर सारथी शिष्यवृत्ती धारक 14 विद्यार्थी असे 25 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र झाले असल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक दादाभाऊ घावटे यांनी दिली.
एनएमएमएस शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना 60 हजार रुपये तर सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना 38 हजार 600 रुपये पुढील पाच वर्षांच्या शिक्षणासाठी मिळणार आहेत.
एनएमएमएस शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी सुजल ढवळे, कल्याणी शेळके, तनिष्का कर्डीले, स्नेहल सुद्रिक, अथर्व कर्डीले, सृष्टी घायतडक, ईश्वरी बिडगर, पायल भुजबळ, चैताली जाधव, विराज चव्हाण व ईश्वरी निरवणे हे एनएमएमएस शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.
सारथी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, तनया लगड, प्रांजल पठारे, आर्या घावटे, दिया कर्डीले, श्रावणी मोरे, श्रेया शेळके, प्रगती आढाव, संस्कृती फरगडे, सुहाना आढाव, साईराज सरोदे, विक्रांत दसगुडे, श्रेयस ढेरंगे, आदित्य दसगुडे व समाधान कदम हे सारथी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.
या विद्यार्थ्यांना संदीप सरोदे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांसह संस्थेचे संचालक मंडळ, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.