-राहुलकुमार अवचट
यवत : दौंड तालुक्यातील पुनर्वसित गावठाणातील नागरी सुविधांसाठी सुमारे 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी दिली आहे.
दौंड तालुक्यात 1976 पूर्वीच्या वीर बाजी पासलकर, पानशेत धरण प्रकल्पाचे पुनर्वसन झालेल्या गावांची संख्या सुमारे 40 आहे. त्या गावातील नागरिकांना नागरी सुविधा मिळाव्यात, यासाठी आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मदत व पुनवर्सन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. या केलेल्या मागणीला प्रतिसाद देत दौंड तालुक्यातील अनेक गावांसाठी सुमारे 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे या गावामध्ये अंतर्गत रस्ते, बंदिस्त गटर, स्मशानभूमी सुधारणा, समाजमंदिर, पाण्याची टाकी आदी कामे केली जाणार आहेत.
गावानुसार मिळालेला निधी पुढीलप्रमाणे – पाटस – 3 कोटी 70 लाख, नानविज – 2 कोटी 46 लाख, गार – 2 कोटी 15 लाख, पारगाव – 1 कोटी 70 लाख, कानगाव – 1 कोटी 56 लाख, गिरिम – 1 कोटी 55 लाख, राजेगाव 1 कोटी 52 लाख, सोनवडी – 1 कोटी 40 लाख, पिंपळगाव – 1 कोटी 14 लाख, मलठण – 97 लाख, राजेगाव – 83 लाख, दौंड – 77 लाख, पेडगाव – 76 लाख, वरवंड – 69 लाख, केडगाव – 63 लाख, हिंगणीबेर्डी – 53 लाख, लिंगाळी – 52 लाख, उंडवडी – 52 लाख, राजेगाव – 45 लाख, वाटलुज – 36 लाख, कासुर्डी – 27 लाख, खामगाव – 26 लाख, दापोडी – 22 लाख, देऊळगावराजे – 13 लाख अशा प्रकारे निधी मंजूर झाला आहे.
मंजूर करण्यात आलेली हि सर्व कामे लवकरच सुरु होतील व नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील असे आमदार राहुल कुल यांनी सांगितले आहे.