पुणे : बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यात सर्वाधिक अर्ज हे पुणे जिल्ह्यातून आले आहेत. पुणे जिल्ह्यातून लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल २० लाख २३ हजार ४३६ अर्ज करण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी मंगळवारी (दि. १५) शेवटचा दिवस होता.
जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी जामसिंग गिरासे यांनी या योजनेसाठी प्राप्त झालेल्या अर्जाच्या आकडेवारीची माहिती दिली. या योजनेसाठी तयार करण्यात आलेल्या नवीन पोर्टलवरून १० लाख ५६ हजार २५ महिलांनी अर्ज केले आहेत. तसेच या पोर्टलवरून अर्ज करताना अजूनही ९६ हजार ७१० महिलांचे बँक खाते आधारकार्डशी लिंक नसल्याचे स्पष्ट झाले आहे.