Pune Crime News : पुणे पोलिसांनी शहरात हायप्रोफाइल वेश्या व्यवसाय करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी ऑनलाईन सेक्स रॅकेटप्रकरणी दोन रशियन आणि एक राजस्थानी अभिनेत्रीला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी विमाननगर परिसरात ही कारवाई केली आहे
पुण्यातील विमानतळ परिसरात उच्चभ्रू हॉटेलमध्ये चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर कारवाई केली आहे. यामध्ये दोन रशियन तरुणी आणि एक राजस्थानी अभिनेत्रीचा सेक्स रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे समोर आले आहे. या सेक्स रॅकेटमध्ये विदेशात बसून दलाल ऑनलाईन बुकिंग घ्यायचे आणि वेश्याव्यवसाय चालायचा.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पुण्यातील विमाननगर भागात पोलिसांकडून हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय करणाऱ्या राजस्थानी अभिनेत्रीसह दोन रशियन मॉडेलला ताब्यात घेतलं आहे. राजास्थानी अभिनेत्री आणि २ मॉडेल ऑनलाइन वेश्या व्यवसाय करण्यासाठी पुण्यात आले. विदेशातून ऑनलाइन माध्यमातून वेश्या व्यवसाय भारतात चालवण्यात यायचा. या ऑनलाइन वेश्या व्यवसायासाठी अभिनेत्री आणि दोन रशियन मॉडेल पुण्यात आल्या होत्या. या हाय प्रोफाइल वेश्या व्यवसायाची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यातील विमाननगर भागात सापळा रचून शिताफीने एका राजस्थानी अभिनेत्रीसह दोन रशिय मॉडेलला वेश्या व्यवसाय करताना ताब्यात घेतलं. पोलिसांच्या कारवाईनंतर हा हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय विदेशातून चालवण्यात येत असल्याचं उघड झालं आहे.
दलाल विदेशात बसून सेक्स रॅकेट चालवायचे
ऑनलाईन बुकींग करून हा वेशाव्यवसाय सुरू होता. विमाननगर परिसरातील उच्चभ्रु हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून या तिघींचे वास्तव्य पुण्यात होते. दलाल विदेशात बसून व्हॉट्सअपवर व्यवहार ठरवायचे आणि सेक्स रॅकेट चालवायचे. तिन्ही मॉडेलला रेस्क्यू होममध्ये पाठवण्यात आलं आहे. इतर तीन दलालांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.