पिंपरी: 19 वर्षीय तरुणाला एक किलो गांजासह पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली. या तरुणाला पिंपरीमधील भाटनगर येथून अटक केली आहे.
फय्याज अली मोहम्मद अली (वय 19 रा.भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरपीचे नाव आहे. याप्रकरणी अमंली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई प्रसाद जंगलीवाड यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना गांजा विक्रीविषयी बातमी मिळताच सापाळा रचून आरोपीला अटक केली. यावेळी आरोपीकडून 34 हजार 140 रुपयांचा 1 किलो 138 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. तपासात तो बेकायदेशीररित्या गांजा विक्री करण्यासाठी आल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात एनडीपीसीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.