पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पुणे जिल्ह्यातून १९ लाख ५० हजार अर्ज आले आहेत. या योजनेसाठी जिल्ह्यातून अपेक्षेपेक्षा अधिक अर्ज आले आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत येत्या सोमवारपर्यंत (दि. ३०) आहे. तीन दिवसांत आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक करून घ्यावा, असे आवाहन महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे. इच्छुक पात्र लाभार्थी महिलांनी त्वरित अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्राची पूर्तता करून आपल्या नजीकच्या अंगणवाडी केंद्रामध्ये सादर करावेत. पात्र लाभार्थ्यांनी पुढील तीन दिवसांमध्ये बँक खात्यास आधार क्रमांक लिंक करून घ्यावा. जेणेकरून योजना लाभाची रक्कम बँक खात्यावर जमा होईल, असे आवाहन जामसिंग गिरासे यांनी केले आहे.