लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या १६ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. एकाच वेळी मोठ्या संख्येने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये रेनबो इंटरनॅशनल स्कूलमधील ३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यातील १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक प्रशांत लाव्हरे यांचे बहुमुल्य मार्गदर्शन मिळाले. यशस्वी विद्यार्थ्याचे व मार्गदर्शकांचे शाळेचे अध्यक्ष नितीन काळभोर, सचिव मंदाकिनी काळभोर व प्राचार्या मीनल बंडगर यांनी अभिनंदन केले. तसेच सर्वांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यशस्वी विद्यार्थिनींचे व शिक्षकांचे सर्वत्र कौतुक
रेनबो इंटरनॅशनल स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात. या शाळेचे विद्यार्थी शिष्यवृत्ती, नवोदय, क्रीडा व विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून चमकले आहेत. यावर्षी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. एकाच वेळी १६ विद्यार्थी विद्यार्थिनींनी लोणी काळभोर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यामुळे यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक व विद्यालयाचे लोणी काळभोरसह जिल्ह्यातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे : अनुष्का सुनील काळभोर, मिताली रूपेश सुदडे, प्रांजल नितीन काळभोर, अनुष्का बलभीम बोदगे, सई संतोष तांदळकर, दुर्वा अमित बोळे, आराध्या संदीप कुतवळ, आरोही अमोल बोंगारडे, तनुश्री नवनाथ पिंगळे, प्राजक्ता शिवाजी गायकवाड, राधा विठ्ठल मांजरे, सृष्टी बालाजी चोपडे, सई प्रदीप मढवई, शर्वरी सोमनाथ साळवे, सृष्टी मनोहर ओंबासे, संस्कृती नितीन बोराटे