पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. रोजलँड सोसायटीच्या एका इमारतीच्या सातव्या मजल्यावरून 14 वर्षाच्या मुलाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी १३ जुलैला सकाळच्या सुमारास घडली. मल्हार मकरंद जोशी (वय-14) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मल्हार जोशी हा नववी च्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचे आई-वडील काल एका कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यामुळे तो आपल्या आईच्या मैत्रिणीच्या घरी गेला होता. त्यावेळी त्याने घराच्या गॅलरीतून उडी घेत आत्महत्या केली. तातडीने त्याला पिंपळे सौदागर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मल्हार जोशी याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या घटनेबाबत मल्हार याच्या आई-वडीलांना माहिती देण्यात आली असल्याची माहिती सांगवी पोलिसांनी दिली.