चाकण, (पुणे) : पुण्यातून एक अजब प्रकार समोर अल्ला आहे. पत्नीच्या नावे असलेल्या गॅस एजन्सीचे पैसे स्वतः च्या बँक खात्यावर वळवून घेतले. त्यातील ३ लाख रुपये पनवेल येथील नृत्यांगना आणि १० लाख रुपये सोने खरेदी करण्यासाठी दिले. यासह एकूण ३ कोटी ७४ लाख ७९ हजार ८४७ रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत ३१ वर्षीय पत्नीने महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनुमंत रावसाहेब पोटे (वय-३१, रा. चिंबळी, ता. खेड) असे अपहार केलेल्या पतीचे नाव आहे. हा प्रकार १ एप्रिल २०२३ ते १५ मे २०२४ या कालावधीत चाकण औद्योगिक भागातील महाळुंगे इंगळे (ता. खेड) पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, हनुमंत पोटे याने त्याच्या पत्नीच्या गॅस एजन्सीतील ३ लाख रुपये पनवेल येथील नृत्यांगनेवर उधळीत १० लाख रुपये तिला सोने खरेदीसाठी दिले. याबाबतची माहिती हनुमंत यांच्या पत्नीला कळताच त्यांनी याबाबत महाळुंगे पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. या घटनेचा पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलिस करीत आहेत.