अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे नराधम बापाने स्वतः च्या मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी नराधम बापाला पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने त्यास ३ संप्टेंबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे वाशिम येथील हे कुटुंब काही वर्षापासुन कामानिमित्त रांजणगाव कारेगाव एमआयडीसीत कामाच्या निमित्ताने आले आहे. पिडित मुलीस एक भाऊ असून तीची आई काही दिवसापासून वडिलाच्या बाहेरख्याली मुळे घर सोडून वेगळी राहत आहे. वडिल चालक म्हणून काम करतात. काही दिवसापासून संबधित पिडीतीचे वडील दुसऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबधात होते.
ही महिला १० दिवसापूर्वी निघून गेली आहे. संबंधित नराधम पिता काही दिवसापासून मुलीवर अत्याचार करीत होता. या सर्व प्रकारने भेदरलेल्या पिडित मुलीने व तीच्या मुलाने या घटनेची माहिती आपल्या आईला दिली. त्यानंतर आईने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीसांनी पॉस्कोचा व बलात्काराचा गुन्हा दाखल करत नराधम पित्यास अटक केली असून पिडीतेस उपचारासाठी पुणे येथील दवाखान्यात दाखल केले आहे.
दरम्यान, रांजणगाव पोलिसांनी नराधम बापाला पुणे येथील विशेष न्यायालयात हजर केले असता. न्यायालायने आरोपीला आठ दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. कारेगाव येथील घटनास्थळी शिरुरचे पोलिस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, महिला पोलिस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे यांनी भेट दिली.
तर सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, ब्रम्हा पोवार, अभिमान कोळेकर, महिला पोलिस हवालदार विद्या बनकर यांच्या पथकाने हि कारवाई केली. पुढील अधिक तपास रांजणगाव एमआयडीसी पोलिस करत आहेत.