पुणे : विमाननगर परिसरात उभ्या करण्यात आलेल्या मोटारीची काच फोडून चोरट्यांनी साडेदहा लाखांची रोकड पळवल्याचा प्रकार सोमवारी (दि. २०) उघडकीस आला. सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने पोलिसांनी तपास जारी केला आहे. यासंदर्भात नितेशकुमार राजकुमार शहा (वय ३४, रा. चारकोप, कांदिवली, मुंबई) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.
शहा हे व्यावसायिक आहेत. ते कामानिमित्त मुंबईहून पुण्याच्या विमाननगर परिसरात आले होते. तेथील वाटिका सोसायटीसमोर त्यांनी रविवारी (दि. १९). रात्री मोटार उभी केली होती. चोरट्यांनी या मोटारीची काच फोडून पिशवीत ठेवलेली साडेदहा लाखांची रोकड लांबवली.