चाकण : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून खेड येथे अत्याचारात बळी गेलेल्या कार्तिकी आणि दुर्वा या दोन मुलींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख असा एकूण दहा लाख रुपयांचा निधी खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी सुपूर्द केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे वर्ग केल्यानंतर त्यांनी तत्काळ हा १० लाखांचा निधी तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे पाठवला. शासकीय बाबींची पूर्तता करुन १० लाखांच्या निधीचा धनादेश पीडित सुनिल मकवाने कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आल्याची माहिती तहसीलदार देवरे यांनी दिली.