पुणे : भारतात इंटरनेटच्या माध्यमातून बालकांचे लैंगिक शोषण अर्थात चाईल्ड पॉर्नोग्राफी करणाऱ्या सुमारे एक लाख आरोपींची ओळख पटविण्यात भारतीय तपास यंत्रणांना यश आले आहे. यातील काही हजार आरोपींना अटक करण्यात आली असून लवकरच उर्वरित आरोपींवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.
इंटरनेटद्वारे चाईल्ड पॉर्नोग्राफीचे व्हिडीओ वितरित करणाऱ्यांची माहिती अमेरिकेतील अमेरिकेतील नॅशनल एजन्सी फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉईटेड चिल्ड्रन (एनसीएमईसी) ही यंत्रणा गोळा करते. आणि एनसीएमईसी ही यंत्रणा पोर्नोग्राफीबद्दलचा एक अहवाल तयार करून तो भारतासह अनेक देशांना वितरित करते. या अहवालाची देशातील तपास यंत्रणा सत्यता व पडताळणी करते. आणि त्यानंतर तपास यंत्रणा आरोपींना अटक करतात.
दरम्यान, मध्य प्रदेशात चाईल्ड पोर्नोग्राफीच्या गुन्ह्यांत ३० हजार आरोपी गुंतले आहेत. त्यांनी अशा प्रकारचे व्हिडीओ अनेकांना पाठविले आहेत. त्यातील चार हजार आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. छत्तीसगढमध्ये ३२०० आरोपींची ओळख पटविण्यात आली आहे. चाईल्ड पॉर्नोग्राफीच्या गुन्ह्यांत राजस्थानमध्ये ८५० आरोपींना अटक झाली आहे. तर चाईल्ड पॉर्नोग्राफीचा व्हिडीओ फॉडवर्ड केला तर पाच वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकतो.