-राहुलकुमार अवचट
यवत : यवत – खुटबाव रस्त्यावर कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.23 डिसेंबर) रात्री 8.15 च्या सुमारास घडली आहे. याबाबत सुनील बागडे यांनी यवत पोलिसांना माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील बागडे हे पत्नीसह यवत खुटबाव रस्त्यावरुन रेनॉल्ट कंपनीची क्विड आर एक्स टी कार नं. एम.एच.42 ए.एच.3508 ने निघाले होते. त्यादरम्यान, शहा यांच्या शेताजवळ गाडीत जळालेला वास येत असल्याने खाली उतरून पाहणी करताना कारने अचानक पेट घेतला. यावेळी गाडीमध्ये राहिलेला मोबाईल व कारसह 1 लाख 70 हजारांच्या मुद्देमालाचे नुकसान झाले.
याबाबत पुढील तपास पोलीस हवालदार खैरे हे करत आहे.