लोणी काळभोर (पुणे)- परभणी जिल्हात आठ दिवसापुर्वी मित्राचा खुन करुन, फरार झालेली तीन जणांची टोळी लोणी काळभोर पोलिसांच्या कार्यतप्तरतेमुळे पोलीसांच्या जाळ्यात कदमवाकवस्ती हद्दीत पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे.
लोणी काळभोर रेल्वे स्थानकात तीन जण मर्डरबाबत चर्चा करत असल्याची माहिती खबऱ्या मार्फरत मिळताच, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित गोरे, पोलिस हवालदार नितीन गायकवाड व शैलेश कुदळे यांनी कार्यतत्परता दाखवत रेल्वे स्थानकावर जाऊन चर्चा करणाऱ्या तीनही जणांना ताब्यात घेतल्याने, खुनासारख्या गंभीर गुन्हातील आरोरी पोलिसांच्या हाती लागले.
आदित्य इस्माईल शेख, मोहम्मद मुजाइद सिद्धीकी व नयुम चाँद शेख (रा. तिघेही करंजी ता. वसमत जि हिंगोली) ही त्या तीन आरोपींची नावे असुन, वरील तिघे शाहरुख शुभम शेख या मित्राचा आठ दिवसापुर्वी खुन करुन पसार झाले होते. दरम्यान लोणी काळभोर पोलिसांनी वरील तीनही आरोपींना अटक करुन, पुढील कायदेशीर कारवाईसाठी हिंगोली जिल्हातील पुर्णा पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, गुरावारी (ता. ५) रात्री अकरा वाजनेच्या सुमारास लोणी काळभोर रेल्वे स्थानकावर तीन तरुण एका मर्डरबाबत चर्चा करत असल्याची माहिती, एका खबऱ्याने पोलिस हवालदार नितीन गायकवाड यांना दिली. ही माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित गोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ लोणी स्टेशनला जाऊन, माहिती घेण्यास सुरुवात केली. यावेळी रेल्वे स्थानकाच्या एका कोपऱ्यात तीनजण चोरुन बसल्याचे आढळुन आले. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, तिघेही घाबरल्याचे आढळुन आले. यावर वकील तिघांनाही पोलिसांनी ताभ्यात घेऊन पोलिस ठाण्यात आनले.
दरम्यान वरील तिघांना पोलिस ठाण्यात आनताच, पोलिसांनी आपल्या पध्दतीने विचारपुस सुरु करताच वरील तिघांनी केलेल्या गुन्हाची माहिती पोलिसांना दिली. यावर वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांनी पुर्णा पोलीस स्टेशनला फोन केला. व संबधित पोलिस ठाण्याच्या एधिकाऱ्यांशी वरील गुन्हाबाबत चर्चा केली असता, आदित्य इस्माईल शेख, मोहम्मद मुजाइद सिद्धीकी व नयुम चाँद शेख देत असलेल्या गुन्हाची माहिती खरी निघाली. सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित गोरे, पोलिस हवालदार नितीन गायकवाड व शैलेश कुदळे यांनी कार्यतत्परता दाखवत पळापळ केल्याने, खुना सारख्या गंभीर गुन्हातील आरोपी पोलिसांच्या हाती लागले.
वरील उल्लेखनीय कामगीरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप कर्णीक, अप्पर पोलीस आयुक्त रंजन शर्मा, विक्रांत देशमुख, बजरंग देसाई, वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण सुभाष काळे (पोलीस निरीक्षक (गुन्हे)) यांच्या मार्गदशनाखाली पोउपनि अमित गोरे, पोहवा गायकवाड, पोहवा पाटोळे, पोना नागलोत, पोना जाधव, पोना देवीकर, पोशि पुंडे, पोशि वीर, पोशि कुदळे, पोशि पवार, पोशि सोनवणे यांच्या पथकाने केली आहे..