राहुलकुमार अवचट
यवत : यवत (ता. दौंड) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त यवत येथील जिल्हा परिषद शाळा येथे विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. या वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथांग जीवन चरित्र व इतिहास इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांनी भाषणातून विचार व्यक्त केले.
यावेळी प्रमुख उपस्थितीत असलेले दौंड तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट अध्यक्ष पत्रकार अनिल गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले.या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रामभाऊ दोरगे यांनी केले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भिमनगर यवत येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सार्वजनिक जयंती साजरी करण्यात आली. सरपंच समीर दोरगे, ग्रामविकास अधिकारी बबन चखाले यांच्याहस्ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले व सामुदायिक पंचशिल बुद्ध वंदना घेण्यात आली. तर यवत ग्रामपंचायत कार्यालय येथेही जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
यावेळी सरपंच समीर दोरगे, ग्रामपंचायत सदस्य सदानंद दोरगे, नाथदेव दोरगे, इब्राहिम तांबोळी,राजेंद्र शेंडगे, ग्रामविकास अधिकारी बबन चखाले, यांसह विविध राजकीय,सामाजिक, क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते
दरम्यान, यवत ग्रामीण रूग्णालय येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रतिमेचे पूजन करून साजरी करण्यात आली. यावेळी यवत ग्रामीण रूग्णालयचे वैद्यकीय अधिकारी डॉ बाळासाहेब कदम, डॉ गरड यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते