राहुलकुमार अवचट
यवत : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून यवत येथील स्थानिक वाहतूक चालक-मालक यांच्या वतीने पी. एम. पी. एम .एल बस थांबा येथे वृक्षरोपण करून अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
यावेळी भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेशभाऊ शेळके, यवत ग्रामपंचायत सरपंच समीर दोरगे, उपसरपंच सुभाष यादव, ह.भ.प. सुळसकर महाराज, ह. भ. प. महादेव महाराज दोरगे, ग्रामपंचायत सदस्य नाथदेव दोरगे, सदानंद दोरगे, ग्रामपंचायत सदस्या मनिषा रायकर, ग्रामविकास अधिकारी बबन चखाले, बाळासाहेब चोभे, परिवहन विभागाचे सुनील भगत आदी मान्यवरांच्या हस्ते पी. एम. पी. एम .एल. बस थांबा परिसरात वृक्षरोपण करण्यात आले.
दरम्यान, अनेक प्रवासी प्रवास करण्यासाठी उन्हामध्ये बसची वाट पाहत असतात प्रवाशांना सावली मिळावी या उद्देशाने सदर उपक्रम राबवण्यात आला असून चालक – मालकांच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी किरण खेडेकर, सचिन चौधरी, पोपट बधे, मोबीन तांबोळी, राजू तांबोळी, नितिन सोनवणे, सिकंदर पठाण, सोहेल तांबोळी रफिक सय्यद, आदी चालक-मालक उपस्थित होते.