युनूस तांबोळी
शिरूर : बेल्हा जेजूरी महामार्गावर अज्ञात वाहनाच्या घडकेने दोन वर्षाची बिबट्याची मादी जागीच ठार झाली असून नुकत्याच अर्धा तासापुर्वी झालेल्या या घटनेचा प्रतिसाद उमटला असून घटनास्थळी वनमजूर महिद्र दाते तत्काळ हजर झाले आहेत.
बेल्हा जेजूरी महामार्गावर जांबूत ( पंचतळे ) ते लाखणगाव या महामार्गावर पंचतळे पासून १००० मिटर वर अज्ञात वाहनाच्या धडकेने दोन वर्षाचा बिबट्या जागीच ठार झाला आहे. बेल्हा जेजुरी हा महामार्गावर नेहमीच वाहनांची जोरदार ये जा सुरू असते. यामुळे अनेक ठिकाणी वाहनांचा अपघात होऊन मानवी जीवाला धोका पोहचला आहे.
हा परिसर तसा बिबट प्रवण क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आला आहे. त्यातून या परिसरात मोट्या प्रमाणात बिबट्याचे दिवसा दर्शन तसेच पाळीव प्राण्यांवर हल्ला होताना दिसतो. त्यामुळे या परिसरात बिबट्य़ा मुळे भयभित वातावरण असल्याचे दिसून येते. गुरूवार ( ता. ८ ) दुपारी ५ वाजून ४५ मिनिटांनी या ठिकाणी अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
या वाहनामुळे या रस्त्यावर बिबट मृत झाल्याची घटना घडली. त्याची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. तत्काळ या घडनेची माहिती मिळताच वनमजूर महेंद्र दाते हे घटनास्थळी पोहचले होते. वनपाल गणेश पवार हे सरकारी गाडी घेऊन पंचनामा करून बिबट्याच्या शवविच्छेदनासाठी बिबट्याला शिरूर येथे घेऊन जाणार असल्याचे दाते यांनी सांगितले. अज्ञात वाहनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.