पुणे : पुण्यात जी -20 परिषदेला आजपासून म्हणजेच सोमवार (ता. १६) ला सुरुवात झालीये. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. आजपासून इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप (IWG)ची दोन दिवसीय बैठक सुरु होणार आहे.
नारायण राणे म्हणाले, “मी स्वतःला भाग्यशाली समजतो की ही जी २० ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे आणि त्याचे उद्घाटन माझ्या हाताने झाले. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देतो. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगती करत आहे. जगातील शहरातील विकास कसा होईल याच्यावर ही परिषद आहे. पुणे, मुंबई, नागपूर ही शहरे जगात आकर्षण ठरत आहेत.”
उपलब्ध करुन देतील. तसेच महाराष्ट्र प्रशासनाबद्दल मला अभिमान आहे. सरकार बदलले की निर्णय बदलतात, या मताशी मी सहमत नाही, मी ३२ वर्ष मंत्री होतो, निर्णय बदलत नाहीत तर दृष्टिकोन बदलतो”, असे नारायण राणे यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत सहभागी होणारे देश आणि संस्था पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीच्या विविध पैलूंवर विचारमंथन करतील. IWG सदस्य राष्ट्रे, अतिथी राष्ट्रे आणि भारताने आमंत्रित केलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे ६५ प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होतील. यादरम्यान ते भारताच्या जी-20 अध्यक्षतेखाली २०२३ च्या पायाभूत सुविधांच्या अजेंडावर चर्चा करणार आहेत.