पुणे : पुणे शहराचे तत्कालीन आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केलेले काम पुढे नेताना पुण्याचे आयुक्त रितेश कुमार यांनी वारजे हद्दीत पहिली मोक्का कारवाई केली आहे.
आयुक्त रितेश कुमार यांनी वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीत पप्या उर्फ वैभव उकरे व त्याचे ८ ते ९ साथीदार यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात आरोपी व त्याचे साथीदार जुना जकात नाका, वारजे परिसरात फिर्यादीच्या घरासमोर आले. पूर्वी फिर्यादी व फिर्यदीचा भाऊ यांच्यासोबत वादविवाद झाले होते. यावेळी आलेल्या आरोपी व साथीदारांनी जुना वाद उकरून काढताना जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच मारण्याच्या उद्देशाने दगड देखील फेकून मारला. मात्र फिर्यादीने तो दगड चुकवला. आरोपीने तोच दगड उचलून फिर्यादीच्या मोटारसायकल मारालांवा गाडीचे नुकसान केले.
यावेळी आरोपी सोबत असणाऱ्या साथीदारांपैकी एकाने हातातील कोयता फिरवताना फिर्यादीच्या घरावर दगडफेक केली. व “पप्पुभाई हा इथला भाई आहे” असे म्हटले. “पप्पु भाईच्या नादाला लागाल तर एकेकाला खल्लास करून टाकेन” असे म्हणत परिसरात मोठ्या प्रमाणात दहशत पासरवताना आरडाओरडा करत निघून गेले.
याबाबत फिर्यादीने वारजे पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आरोपी व त्याच्या साथीदारांवर भादवि कलम ३०७, ४२७.३३६, ३३७, ५०४, ५०६ (२), १४३, १४७, १४८, १४९, आर्म अॅक्ट ४ (२५) म.पो. का. क ३७ (१) (३)/१३५.क्रि. लॉ. अमे. अॅक्ट कलम ३ व ७ प्रमाणे वारजे पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.