पुणे : इंधनाचे दर कडाडले आहेत तर दुसरीकडे रिजर्व बॅंकने व्याजदरात वाढ केल्याने हप्ता आणि कर्ज वाढले आहेत. त्यापाठोपाठ आणखी एक धक्का मिळाला आहे. पुण्यात सीएनजीच्या (CNG) दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. CNG च्या दरात पुन्हा एकदा 4 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्षा आणि कारने फिरणं म्हणजे खिसा रिकामा करण्यासारखं होणार आहे.
आता प्रती लिटर CNG साठी पुणेकरांना 91 रुपये मोजावे लागणार आहेत. आजपासून हे नवे दर लागू करण्यात येणार आहेत. ऐन सणासुदीच्या काळात ही वाढ झाल्याने नागरिकांना धक्का मिळाला आहे.
दुसरीकडे रिक्षा आणि टॅक्सीचे दर मुंबईत अनेक ठिकाणी वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्ही जर सणासुदीच्या काळात मुंबई-पुण्यात प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.
दुसरीकडे दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार महानगरांमध्ये इंधनाच्या दरात कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे इंधनाचे दर गेल्या आठवड्यापासून स्थिर आहेत.