संदीप टुले
दौंड : पारगाव (ता. दौंड) पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांना शेत पंपासाठी लागणारा विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होत असून विजे अभावी पिके जळू लागली आहेत. दिवसातून बरेच वेळा सतत पुरवठा खंडित केला जात असून त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ऊस लागवड, तरकारी, जाणवरांचे खाद्य, आणि बिबट्याची वाढता वावर, या सर्वांवर उपाययोजना करण्यासाठी पारगाव वि.का. सोसायटीचे संचालक संभाजी ताकवणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंता येडके यांना निवेदन दिले आहे. व तत्काळ विजपुरवठा सुरळीत करण्याबाबत विनंती केली.
यावेळी बोलताना कार्यकारी अभियंता येडके म्हणाले की, विज फोर्स कपातीसाठी केली जात आहे. मात्र शेतकऱ्यांच्या मागणी नूसार विज ऐका विशिष्ठ कारणासाठी कपात न करता सर्वांना सामान मिळावी. यावेळी तात्काळ उपायोजना करणार आहे. असे आश्वासन येडके यांनी शेतकऱ्यांना दिले आहे.
यावेळी विजयराव चव्हाण , महादेव डोंबाळे,विकासनाना ताकवले,सुभाष ताकवणे,ज्ञानेश्वर भोगावडे,प्रभादादा ताकवणे, शिवाजी बोत्रे ,कांतीलाल जगताप,त्रिंबक चौधरी,राजेंद्र जगदाळे आदी उपस्थित होते.