पुणे : पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेच्या ( DRDO ) शास्त्रज्ञाला एटीएसने जेरबंद केले आहे. हनीट्रॅपमध्ये सापडून पाकिस्तानला माहिती दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे खळबळ उडाली आहे .
संरक्षण संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञाने पुणे येथील त्यांचे कार्यालयामधून पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटीव्ह ( PIO ) यांच्याशी सोशल मिडियाच्या माध्यमातून व्हॉटअॅपद्वारे व्हाईस मेसेज, व्हिडिओ कॉलने संपर्कात राहिल्याची माहिती समोर आली आहे.
डिआरडीओचे शास्त्रज्ञ यांनी पदाचा गैरवापर करत त्यांच्या ताब्यात असलेले संवेदनशील शासकीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करत त्यांना अटक केली आहे.
डीआरडीओ ही संस्था लष्करासाठी युद्ध साहित्य तसेच तंत्रज्ञान विकसीत करते. त्यामुळे तीला संवेदनशील मानलं जातं. दरम्यान या संस्थेचे अधिकाऱ्याने हनीट्रॅपमध्ये अडकून संस्थेची संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे एटीएसने मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पुणे एटीएसकडे सोपवण्यात आला आहे.