युनूस तांबोळी
शिरूर महिला पालकांनी मुलींना ‘खरा स्पर्श आणि वाईट स्पर्श’ याचे शिक्षण घरातूनच देणे आवश्यक आहे. योग्य आहारातून आरोग्याची शिकवण देत असताना वयानुसार शरीरात घडणारे बदलांची माहिती द्यावी. व्यायामातून सुदृढ शरीर बनविताना त्यांच्या मनोरंजनाच्याखेळातून कला क्रिडाचे ज्ञान द्यावे. त्यातून भविष्यात याच मुली राष्ट्रिय पातळीपर्यत यशस्वी होण्यास मदत होईल. यासाठी महिला पालकांनी
पुढाकार घेण्याचे आवाहन तेजस्वीनी महिला फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली चव्हाण यांनी केले.
शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शासनामार्फत घेण्यात आलेल्या “जागरूक पालक सुदृढ बालक व माता सुरक्षित तर घर सुरक्षित” या दुसरा टप्पा अभियानाचा शुभारंभ तसेच महा आरोग्य शिबीराचे उद्घाटन सरपंच समिक्षा फराटे यांच्या हस्ते पार पडले.
त्यावेळी किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
यावेळी सरपंच हरिभाऊ चांदगुडे, सचिन शेलार,गणेश मचाले,
मांडवगण ग्रामपचायतीचे सर्व सदस्य,केंद्रप्रमुख घुमरे सर,कार्यक्षेत्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक अंगणवाडी मुख्य सेविका राणी कांबळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारीउपस्थित होते.
या महाआरोग्य शिबीरात स्रीरोग,बालरोग,गरोदर माता ,स्तनदा माता,असंर्गजन्य आजार, किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी , दंतरोग, नाक, कान घसा तपासणी, नेत्र तपासणी, या बाबींच्या सेवा मोफत देण्यात आल्या होत्या.
दरम्यान, किशोरवयीन मुलींना पौगंडावस्थेतील मानसिक व शारीरिक समस्या व उपाययोजना याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. व त्यांच्यासाठी मेडिटेशन चे शिबीर घेण्यात आले. यावेळी आलेल्या नवविवाहित जोडप्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आलेल्या महिला व किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. यावेळी लाभार्थ्यांचे आभा कार्ड काढून देण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रस्तावित मुख्याध्यापक चव्हाण यांनी केले. सुत्रसंचालन उप मुख्याध्यापक जोशी यांनी केले. कारखेले व घोडके यांनी उपस्थितांचे आभार मानले.