दीपक खिलारे
इंदापूर : महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल चे सदस्य तथा वक्फ बोर्डचे सदस्य प्राचार्य ॲड. अहमद खान-पठाण यांचे ‘हिंदू व मुस्लिम वारसा कायद्यातील तुलनात्मक फरक व मुस्लिम कायद्यातील स्त्रियांचे अधिकार’ ह्या विषयावर गुरुवारी (ता.१६ ) इंदापूर न्यायालयात व्याख्यान झाले अशी माहिती इंदापूर बारचे सेक्रेटरी ॲड. आशुतोष भोसले यांनी दिली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. मनोहर चौधरी हे होते.
यावेळी ॲड. अहमद खान-पठाण यांनी हिंदू व मुस्लिम कायद्यामधील संपत्तीच्या वाटपाच्या विविध पद्धती, दोन्ही कायद्यामधील वडोलोपार्जित वाटपामधील फरक, मृत्युपत्र, तिहेरी तलाक व मुस्लिम विवाह कायदा व शरियत व मुस्लिम कायद्यामधील महिलांचे विशेष अधिकार याबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस इंदापूर वकील संघटनेच्या वतीने ॲड. अहमद खान-पठाण यांचे स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमास ॲड.विजय आजोतिकर, ॲड.प्रकाश वाघमोडे, ॲड. एल. पी.शिंगाडे, ॲड.के. डी. यादव, ॲड. समीर टिळेकर, ॲड. तेजसिह पाटील, ॲड. सतीश देशपांडे, ॲड. अशफाक सय्यद, ॲड. जमीर मुलाणी, ॲड. सुभाष भोंग, ॲड. रुद्राक्ष मेनसे, ॲड. राजू ठवरे, ॲड. रवींद्र कोकरे यांसह इंदापूर वकील संघटनेचे वकील बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.