राजेंद्रकुमार शेळके
पुणे – वडगाव बुद्रुक येथील श्रीमती काशीबाई नवले महाविद्यालयाने आयोजित कार्यशाळेत सुमारे ८० विद्यार्थ्यांनी नाव नोंदवले होते. या कार्यशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक कौशल्य, अतिशय सोप्या व इंटरॅक्टिव्ह पद्धतीने विद्यार्थ्यांना देण्यात आला. या कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग व मिनी प्रोजेक्ट स्वतः करण्यासाठी मार्गदर्शन मिळाले.
अतिशय आनंदी व इन्फॉर्मशन अशा दोन दिवसाच्या कार्यशाळा विद्यार्थ्यांना लाभदायक ठरल्या. या कार्यशाळाची व्हॅलिडीटी फंक्शन दुसऱ्या दिवशी इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटचे सेमिनार हॉलमध्ये संपन्न झाले. यावेळी कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सर्टिफिकेशन व अप्रिसिएशन विभाग प्रमुख डॉक्टर सोनल जगताप यांच्या हस्ते देण्यात आले.
कार्यक्रमाचे वेळी मंचावर संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक एम.एन. नवले, संस्थापक सचिव डॉ. सौ. सुनंदा एम. नवले, उपाध्यक्ष एच.आर. डॉ. रोहित नवले, उपाध्यक्षा अडमिन सौ. रचना नवले –अष्टेकर, प्राचार्य डॉ.ए.व्ही. देशपांडे ,उपप्राचार्य डॉ .के .आर. बोरोले,डॉ. जगताप, श्रीमती इंगवले मॅडम प्रा.आर एल नंदरगी,प्रा.आर.डी. कांबळे व प्रा. विवेक निवाणे व इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक सेंटर कम्युनिकेशनचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.