– संगीता कांबळे
पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयात गणित व संख्याशास्त्र विभागाच्या वतीने ( दि. 22 जुलै) रोजी ‘π Approximation Day’ हा उपक्रम साजरा करण्यात आला. या उपक्रमासाठी 160 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमावेळी गणित व संख्याशास्त्र विभाग प्रमुख प्रा. विजय घारे यांनी प्रास्ताविक केले. प्राथमिक फेरीमध्ये प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली. त्यातील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, रामानुजन आणि भास्कराचार्य असे चार संघ करण्यात आले. त्यानंतर ‘बझर बिटर’ लावून त्यांची स्पर्धा घेण्यात आली. रामानुजन हे संघाचे नाव असून त्यात सहभागी विद्यार्थ्याची नावे दर्शन पाटील, विशाल देवकर, आर्यन सोळस्कर हे आहेत.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांनी समाजात वावरताना नीट ऐकण्यावर भर देण्यात यावा, असा संदेश दिला. इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख प्रा. अनंत पवार यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी सूत्रसंचालन प्रा. शैलेश सुरोशे आणि आभार प्रदर्शन प्रा.प्रियांका महाजन यांनी केले. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.कदम अनुपमा, प्रा.अल्लापुरकर रेणुका, प्रा.पाटील प्राजक्ता, प्रा.महाजन भाग्यश्री यांनी परिश्रम घेतले.